Vibhag Bharti
जल, वन आणि बऱ्याच विभागामधील भरती ची माहिती आता मराठी मध्ये.

राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम 2023 संपूर्ण माहीती बघा - State Excise Syllabus

सामग्री सारणी

          नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर राज्य उत्पादन शुल्क भरती ची तयारी करत आहात तर तुम्हाला त्याचा अभ्यासक्रम माहिती च असेल! नसेल माहिती तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी State Excise Bharti Exam 2023 या article मध्ये राज्य उत्पादक शुल्क विभागाने 2023 चा राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 चा अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. याशिवाय पदानुसार परीक्षेचे स्वरूप कसे असतील त्याबद्दल ही या article मध्ये चर्चा करणार आहोत तरी पण प्रस्तुत article तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा ही नम्र विनंती.

राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम 2023 – State Excise Bharti Exam 2023

आपल्याला अभ्यासक्रम माहिती असेल तरच आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळत असते याच गोष्टीचा संपूर्ण विचार करून राज्य उत्पादन शुल्क भरती विभागाने 2023 चा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानुसार जवान, जवान – नि – वाहनचालक, लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, चपराशी या 5 विविध पदांसाठी एकूण 512 रिक्त पदांची जाहिरात काढलेली आहे. आता आपण पुढे वरील दिलेल्या विविध पदांनुसार त्यांचा अभ्यासक्रम पाहुया.

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अभ्यासक्रम – State Excise Exam Syllabus 2023

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केल्यानुसार वरील विविध पदांसाठी एकच अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे त्यात बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी हे विषय असणार आहेत. या विषयातील कोण कोणत्या घटकांवर प्रश्न विचारले जातील ते आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. 

  • बुद्धिमापन चाचणी 

बुद्धिमत्ता चाचणी च्या माध्यमातून उमेदवार किती लवकर आणि अगदी अचूकपणे विचार करून निर्णय घेऊ शकतो या दृष्टीने बुद्धिमत्ते वरील प्रश्न विचारले जाणार आहेत.

  • सामान्य ज्ञान 

सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला भारताचा व तसेच महाराष्ट्राचा भूगोल विचारला जाणार आहे याशिवाय महाराष्ट्राचे विशेष संदर्भ, नागरिकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी देखील सामान्य ज्ञान मध्ये विचारले जाणार आहे आणि यासोबतच आधुनिक भारताचा इतिहास सुद्धा सामान्य ज्ञान मध्येच विचारला जाणार आहे. 

  • मराठी 

मराठी मध्ये म्हणी व वाक्यप्रचार तसेच त्यांचा अर्थ, वाक्यात उपयोग करणे, सर्वसामान्य शब्दांचा संग्रह, वाक्य रचना आणि मराठीतील व्याकरण सुद्धा मराठी मध्ये विचारला जाणार आहे.

  • इंग्रजी 

इंग्रजी या विषयामध्ये सुद्धा इंग्रजी चा व्याकरण तसेच Common vocabulary, Sentence structure, Use of Idioms & Phrases and their meaning, and Comprehension of passage हे विचारले जाणार आहे. 

        

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 परीक्षा स्वरूप – State Excise Exam Criteria 2023

         आता आपल्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने जो अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे ते तर समजलेच आहे. आता आपण त्या राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 या परीक्षेचे स्वरूप कसे असतील यावर चर्चा करुया. 

जवान, लघुलेखक, टंकलेखक आणि जवान – नि – वाहनचालक

      सर्वप्रथम आपण जवान, लघुलेखक आणि टंकलेखक यांच्या परीक्षेचे स्वरूप बघुया. यांची परीक्षा 2 टप्यात होणार आहे पहिल्या टप्प्यात ऑनलाईन लेखी परीक्षा घेण्याचे निश्चित केलेले आहे तर दुसऱ्या टप्प्यात शारीरिक परीक्षा घेण्याचे निश्चित केलेले आहे. त्याबद्दल आपण सविस्तर पाहुया.

लेखी परिक्षा 

 जवान, टंकलेखक, लघुलेखक आणि जवान – नि – वाहनचालक यांची परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असून यात वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. एकूण 120 गुणांची आहे आणि त्यात 120 प्रश्न आहेत. एका बरोबर उत्तरास एक गुण दिला जाईल तर चार उत्तर चुकल्यास 1 गुण वजा केला जाईल म्हणजे एक चतुर्थांश Negative Marking असणार आहे. आता कोणत्या विषयासाठी किती गुण आणि किती प्रश्न दिलेले आहेत. परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शाळेतील परीक्षेएवढा असेल आणि या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला 45 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. यावर आपण सविस्तरपणे खालील तक्त्यानुसार चर्चा करूया.

विषयाचे नाव प्रश्न गुण

परीक्षेचे

माध्यम 

कालावधी
बुद्धिमत्ता चाचणी 30 30 मराठी व इंग्रजी

1 तास आणि 

 30         मिनिटे

सामान्य ज्ञान 30 30 मराठी व इंग्रजी
मराठी 30 30 मराठी
इंग्रजी 30 30 इंग्रजी
एकूण 120 120  

शारीरिक चाचणी परीक्षा 

लेखी परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी असणार आहे. ते पुरुषांसाठी कोणत्या स्वरूपाची असणार आहे आणि महिलांसाठी कोणत्या स्वरूपाची असणार आहे. याबद्दल आपण खालील तक्त्यानुसार जाणून घेऊयात. तसेच या परीक्षेमध्ये देखील लेखी परिक्षा सारखेच उत्तीर्ण होण्यासाठी 45 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे आणि ही परीक्षा 80 गुणांसाठी होणार आहे.

शारीरिक चाचणी (पुरुष)
1.5 km धावणे आहे. 30
100 मीटर धावणे आहे. 30
गोलाफेक करणे आहे. 20
एकूण गुण 80
शारीरिक चाचणी (महिला)
1 km धावणे आहे. 30
100 मीटर धावणे आहे. 30
गोलाफेक करणे आहे. 20
एकूण गुण 80

चपराशी

आता आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठरविलेल्या चपराशी या पदासाठी जाहीर केलेल्या परीक्षेचे स्वरूप पाहुया..

      चपराशी या पदासाठी 2 टप्प्यात परीक्षा न घेता एकाच टप्प्यात 200 गुणांची लेखी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असून यात 200 प्रश्न असून वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. 1 बरोबर उत्तरास 1 गुण दिला जाईल तर 4 चुकीच्या उत्तरास 1 गुण वजा करण्यात येणार आहे म्हणजेच या परिक्षेमध्ये देखील एक चतुर्थांश Negative Marking असणार आहे आणि ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी 45 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. या परीक्षेचा दर्जा माध्यमिक शाळेतील परीक्षेएवढाच असणार आहे. या परीक्षेमध्ये कोण कोणत्या विषयांसाठी किती गुण आणि किती प्रश्न विचारले जातील याबाबत तक्त्यानुसार सविस्तर पाहुया.

विषयाचे नाव प्रश्न गुण

परीक्षेचे

माध्यम 

कालावधी
बुद्धिमत्ता चाचणी 50 50 मराठी व इंग्रजी 2 तास
सामान्य ज्ञान 50 50 मराठी व इंग्रजी
मराठी 50 50 मराठी
इंग्रजी 50 50 इंग्रजी
एकूण 200 200  
 

  Conclusion 

           तर मित्रांनो आम्ही तुम्हाला State Excise Jawan Bharti Exam 2023 या article च्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क परीक्षा 2023 बद्दल संपूर्ण माहिती देऊन सोबतच परीक्षेचा अभ्यासक्रम कसा राहील व परीक्षेचे स्वरूप कसे असतील याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. वरील माहिती वाचून तुम्हाला आमचा हा प्रस्तुत article कसा वाटला ते आम्हाला Comment द्वारे नक्कीच कळवा तसेच तुमच्या मित्र मंडळी पैकी किंवा नातेवाईकांमध्ये विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत असतील तर त्यांना हा article नक्कीच शेअर करा. तुमच्या एका share मुळे कुणाचं तरी करियर बनू शकतं त्यामुळे नक्कीच हा article share करायला विसरू नका.

 अधिक माहितीसाठी www.stateexcise.maharashtra.gov.in त्यांचा या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम साठी सतत विचारले जाणारे प्रश्न

राज्य उत्पादन शुल्क 2023 परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे.

होय. या परीक्षेत नकारात्मक गुण म्हणजेच Negative Marking एक चतुर्थांश म्हणजेच 4 चुकीच्या प्रश्नांसाठी 1 गुण वजा करण्यात येईल.

टंकलेखक, लघुलेखक, जवान आणि जवान – नि – वाहनचालक या पदाच्या परीक्षा दोन टप्प्यात होणार आहेत पहिल्या टप्प्यात लेखी ऑनलाईन परीक्षा तर दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी परीक्षा होणार आहे.

www.stateexcise.maharashtra.gov.in हि राज्य उत्पादन शुल्क विभागाची अधिकृत website आहे.

indian-air-force-agniveer-bharti feature image
वायुदलात झेप! IAF अग्निवीर भरती २०२४ – १२वी उत्तीर्णांसाठी संधी!

१२वी उत्तीर्ण झालात ? आणि मनात देशसेवा करण्याची अदम्य इच्छा असेल, तर इथे तुमच्यासाठी एक संधी आहे! भारतीय वायुसेना (IAF) ची IAF अग्निवीर भरती २०२४ आता तुमच्यासमोर उभी आहे.

पुढे वाचा »
samajik ankeshan mhanje kay blog feature image
सामाजिक अंकेक्षण म्हणजे काय?

आत्ताच काही दिवसांपूर्वी सामाजिक अंकेक्षणावर स्थापन केलेल्या जॉइंट टास्क फोर्स ने आपल्या अहवालात सामाजिक अंकेक्षण हे प्रशासनातील पारदर्शकता राखून ठेवण्याचे एक महत्त्वाचे साधन असल्याचे सांगितलेले आहे. हे लक्षात घेतले जाऊ शकते की सर्वोच्च न्यायालय

पुढे वाचा »
adivasi-jamatinche-nave-blog feature image
महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची नावे

आपण महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची नावे आणि वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण भारतातील सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात आदिवासींची लोकसंख्या 1,05,10,213 इतकी आहे, जी

पुढे वाचा »
hbcse-bharti
एचबीसीएसई भरती २०२४

१०th पास असणारयांसाठी प्यून, चौकीदार, माली इत्यादी हे चांगल्या कॉलेज मध्ये रिक्त जागा निघाल्या आहेत , त्यामुळे जर तुम्हची निवड झाली तर

पुढे वाचा »
राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम 2023 संपूर्ण माहीती बघा – State Excise Syllabus

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर राज्य उत्पादन शुल्क भरती ची तयारी करत आहात तर तुम्हाला त्याचा अभ्यासक्रम माहिती च असेल! नसेल माहिती तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी State Excise Bharti Exam 2023 या article मध्ये राज्य उत्पादक शुल्क विभागाने 2023 चा राज्य उत्पादन शुल्क भरती 2023

पुढे वाचा »
maharashtra krushi agriculture assistant recruitment
आपल्या राज्या मध्ये कृषी सेवक या पदाच्या ३६५ जागा निघाल्या आहेत, संपूर्ण जाहिरात पहा

महाराष्ट्राच्या कृषी विभाग ह्या डिपार्टमेंट मध्ये मंडळ मध्ये कृषी पदवीधरांसाठी कृषी सेवक या पदासाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत.

पुढे वाचा »
mpcb advertisment
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांसाठी भरती, छान पगार मिळेल

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांसाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत. या भरती मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ,ब आणि क

पुढे वाचा »
adivasi unati mandal bharti feature image
आदिवासी उन्नती सेवा मंडळ अहमदनगर मध्ये ७ वी ते पदवीधर उमेदवारासाठी भरती

आदिवासी उन्नती सेवा मंडळ अहमदनगर मध्ये ७ वी ते पदवीधर उमेदवारासाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत

पुढे वाचा »
buldhana mgnrega bharti
बुलढाणा मध्ये १० पास असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, लगेच फॉर्म भरा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत भरती

बुलढाणा मध्ये १० पास असणाऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत भरती निघाली आहे,आम्ही याची पूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे

पुढे वाचा »
©2023 Vibhag Bharti